Ganesh Visarjan Place near the flooded Kotrachi river, on Thursday, 22 July, 2021  Dashrath Morajkar / Gomantak
गोवा

Kotrachi River: ठाणे सत्तरी तील कोत्राची नदीला पूर

गणपती विसर्जन निवाऱ्याची (Ganesh Visarjan Place) कोसळलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधून देण्याची मागणी (Demand from locals)

दशरथ मोरजकर

ठाणे सत्तरी (Thane Sattari) येथून वाहणाऱ्या कोत्राची नदीला (Kotrachi River) पूर आल्याने नदीचे पाणी शेती बागायतीतून वाहू लागले आहे. चोर्ला घाटातील (Chorla Ghat) सुर्ला भागातून उगम पावणारी ही नदी गोळावली, ठाणेतून मासोर्डे येथे म्हादई नदीला(Mhadei River) मिळते. सध्या दिवसभर संपूर्ण गोव्यात (Goa) मुसळधार पाऊस पडत असल्याने (Rainy Season in Goa) या कोत्राची म्हणजेच वेळूस नदीला (River Velus) पूर आला आहे. पुराचे पाणी नदी किनारी भागातील शेतीबागायतीतून आणि सकल भागांतून वाहू लागल्याने बागायतीचे फार मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे (Farmers of Sattari - Goa) म्हणणे आहे.

या नदी किनारी ठाणे - देसाई वाडा( desai wada thane ) येथे असलेला गणपती विसर्जन निवारा या पुराच्या पाण्याखाली गेला आहे. नदीचे पाणी या परिसरात पूर्णपणे भरल्याने येथे असलेला कच्चा रस्ता ही पाण्याखाली गेला. हा गणपती विसर्जन निवारा नदीच्या तीरावर असून निवाऱ्याचा ठिकाणची संरक्षक भिंत ही दोन वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्याने कोसळल्याने पुराचे पाणी निवाऱ्यात शिरले आहे. त्यामुळे तशीच संरक्षक भिंत पुन्हा बांधण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT