Kosambi thought festival Margao this year Dainik Gomantak
गोवा

Goa Festival: कोसंबी विचार महोत्सव यंदा मडगावमध्ये

Goa Festival: पाच व्याख्याने : रवींद्र भवनमध्ये १० ते १४ नोव्हेंबरपर्यंत चालणार व्याख्यानमाला

दैनिक गोमन्तक

Goa Festival: डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे यंदा प्रथमच रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात यंदा पाच व्याख्याने होणार आहेत. १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या महोत्सवात जागतिक कीर्तीचे विचारवंत, लेखकांना ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या विचार महोत्सवाला विद्यार्थी, नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले. संस्कृती भवनात बहुउद्देशीय सभागृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृती खात्याचे सचिव नारायण सावंत, उपसंचालक अशोक परब उपस्थित होते.

मंत्री गावडे म्हणाले की, या महोत्सवाचे उदघाटन गुरुवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांचे ‘बहुभाषिक गोव्याची कथा’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानमालेत प्रा. माधवी मेनन हरियाणा, डॉ. देवदत्त पटनायक मुंबई, डॉ. सूरज येंगडे केंब्रिज युएसए, प्रा. प्रणय लाल दिल्ली यांची व्याख्याने होतील. या विचार महोत्सवाला उपस्थि राहण्याचे आवाहन मंत्री गावडे यांनी केले आहे.

मावजो यांच्या व्याख्यानाने प्रारंभ

दरवर्षी या महोत्सवात चार व्याख्याने व्हायची. मात्र, यंदा पाच व्याख्याने होणार आहेत. यंदा ज्येष्ठ गोमंतकीय लेखक दामोदर मावजो यांच्या व्याख्यानाचा समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवातील व्याख्यात्यांची निवड चार सदस्यीय समितीद्वारे करण्यात आल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

म्हणून मडगावात आयोजन

कला अकादमीचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा मडगावात या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात श्रोत्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, यासाठी शिक्षण संचालनालयालाही पत्राद्वारे कळविल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.

हे बायोकेमिस्ट आहेत आणि सार्वजनिक आरोग्यावरील बिगर सरकारी संस्थेसाठी ते काम करतात. वर्तमानपत्रांसाठी व्यंगचित्रकार, जाहिरात एजन्सीसाठी ॲनिमेटर आणि पर्यावरण प्रचारक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे पहिले पुस्तक ‘इंडिका : अ डीप नॅचरल हिस्ट्री ऑफ द इंडियन सबकॉन्टिंट’ हे ॲलन लेन यांनी डिसेंबर २०१६ मध्ये प्रकाशित केले. त्याला सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन पदार्पण पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या ते इतर दोन पुस्तकांवर काम करत आहेत.

व्याख्याते, मान्यवरांंचा परिचय

दामोदर मावजो हे कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक असून साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. प्रभावी कथाकार आणि कादंबरीकार म्हणून परिचित असलेल्या मावजो यांची ''कार्मेलीन'' ही कादंबरी अत्यंत गाजली होती. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली ही कादंबरी अनेक भारतीय भाषांत अनुवादित झाली आहे. प्रागतिक विचारांचा पुरस्कार करणारे मावजो यांनी अनेक परिसंवाद आणि अधिवेशनांमध्ये भाग घेतला आहे.

हे ‘मिथक’ या विषयावर लेखन करतात. गेल्या २५ वर्षांत त्यांची ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून ‘देवलोक आणि बिझनेस सूत्र’ हा त्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. ते वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन देखील करतात.

हे ‘कास्ट मेटर्स’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक असून त्या पुस्तकाच्या अनुवादाला केरळ सरकारचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. तसेच दलित फिल्म फेस्टिव्हलचे ते संस्थापक आहेत. आगामी काळात त्यांची आणखी काही पुस्तके प्रकाशित होणार आहेत.

या अशोक विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत, तसेच सेंटर फॉर स्टडीज इन जेंडर ॲण्ड सॅक्शुॲलिटीच्या संचालक आहेत. त्यांची लिंगभेदावरील अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्या भारतात परतण्यापूर्वी अमेरिकन विद्यापीठात कार्यरत होत्या. त्या ‘द लॉ ऑफ डिझायर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT