Hyojeong Park In Goa: दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला. ह्योजॉन्ग मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली. त्यानंतर याप्रकाराची तात्काळ दखल घेऊन या तरूणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली. या प्रकारानंतर ही तरूणी भारतात चांगलीच प्रसिद्ध झाली. दरम्यान, नुकतेच या तरूणीने गोव्याला भेट दिली.
(Korean Youtuber Hyojeong Park In Goa)
दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग गोव्याच्या प्रेमात पडली आहे. तिने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याची निवड केली. गोवा भेटीत तिने विविध ठिकाणांना भेट दिली व निसर्गाचा आस्वाद घेतला. ह्योजॉन्गने आपल्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील एक व्हिडिओ आणि विविध फोटो शेअर केले आहेत.
गोव्यात ह्योजॉन्ग पाच सहा दिवस मौज मजा केल्यानंतर ता तिला शिलॉगला गेली आहे. गोव्यात खूप धम्माल केल्याची भावना ह्योजॉन्गने व्यक्त केली.
लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना ह्योजॉन्गची मुंबईतील खार परिसरात दोन तरुणांनी छेडछाड केली. मोबीन चंद मोहम्मद शेख (19) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (20) असं दोन आरोपींचा नावं असून मुंबई पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.