CCTV: वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर, थेट मोबाईलवर येणार तालांव; पणजी, पर्वरीत तिसरा डोळा कार्यरत

पणजी आणि पर्वरीत एआय सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करण्यात आले आहेत.
CCTV In Panaji Porvorim
CCTV In Panaji Porvorim Dainik Goamantak
Published on
Updated on

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गोवा पोलिस आणि प्रशासन काम करत आहे. स्मार्ट सिटी पणजीत या दृष्टिने पाऊले टाकण्यास सुरूवात झाली असून, पणजी आणि पर्वरीत (Panaji And Porvorim) एआय सीसीटीव्ही कॅमेरे (AI CCTV) कार्यरत करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट त्याच्या मोबाईलवर तालांव (दंडाची पावती) पाठवली जाणार आहे.

CCTV In Panaji Porvorim
Goa Police: मोबाईल चोर! बिहार, कर्नाटक, युपी येथील सहा जणांना अटक; 37 मोबाईल फोन जप्त

येथे बसविण्यात आले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे

पणजी- दिवजा सर्कल ते गोवा विद्यापीठ

सात पैकी चार कॅमेरे दिवजा सर्कल, बंदर खाते, फेरी पॉईंट आणि कला अकादमी येथे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवतील. तर, करंजाळे, गोवा विद्यापीठ येथील कॅमेरे वेग मर्यादा व चिंबळ येथील कॅमेरा सिग्नलवरती लक्ष ठेवणार आहे.

पर्वरी - ओ- कोकेरा जंक्शन, तीन इमारत, माळी सर्कल आणि होंडा शोरूम

CCTV In Panaji Porvorim
South Goa: सुखद बातमी! दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांसाठी दक्षिण गोवा रूग्णालयात खास सेवा

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वाहन चालकाने सिग्नल तोडला किंवा वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्याला आता दंड बाजावला जाणार आहे. आणि याची पावती त्याला मोबाईलवर पाठवली जाणार आहे.

सिग्नल तोडल्यास 500 रूपये आणि वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास 1000 रूपये दंड ठोठावला जाणार आहे. आणि दोन्ही केल्यासा त्याचा थेट परवाना निलंबित केला जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाला थेट त्याच्या मोबाईल वरती दंडाची पावती पाठवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com