Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: आक्रमक नागरिकांच्या मागणीनंतर पोलिसांनी वेलिंगकरांच्या अटकेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
Subhash Velingkar And Relics of St. Francis XavierDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत कॅथलिक समाज संतप्त झाला आहे. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करण्याची मागणी वेलिंगकरांनी केली होती.

राज्यात दोन दिवसांपासून ख्रिस्ती समाजाने आक्रमक होत अटकेची मागणी केलीय. दरम्यान, वेलिंगकर बेपत्ता असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय. तसेच, वेलिंगकरांनी अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून, तात्पूर्ता त्यांना दिलासा मिळालेला नाही.

वेलिंगकरांच्या अटकेची मागणी गेल्या दोन दिवसांपासून तीव्र झाली आहे. ख्रिस्ती समाजाने आक्रमक होत मडगावमध्ये चक्काजाम केला, कोलवा सर्कलवर एकत्र येत नागरिकांना रस्ता आडवला. वेलिंगकरांना अटक झाल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला.

आक्रमक नागरिकांच्या मागणीनंतर पोलिसांनी वेलिंगकरांच्या अटकेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पोलिसांकडून वेलिंगकरांच्या अटकेसाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वेलिंगकर बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे वेलिंगकर अटक टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. वेलिंगकरांनी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला खरा पण, कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत सोमवारी सुनावणी ठेण्यात आली आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

झुआरी ब्लॉक करण्याचा इशारा

वेलिंगकरांना सायंकाळी सात वाजेपर्यंत अटक न केल्यास नवा झुआरी पूल ब्लॉक करण्याचा इशारा संतप्त कॅथलिक समाजातील नागरिकांनी दिला आहे.

दोन दिवसांपासून कॅथलिक समाज आक्रमक झाल्याने सरकार आणि पोलिस प्रशासनावर देखील दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे वेलिंगकरांना अटक होते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, वेलिंगकरांच्या अटकेबाबत मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याची माहिती मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि आमदार दिलायला लोबो यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com