Goa Police: मोबाईल चोर! बिहार, कर्नाटक, युपी येथील सहा जणांना अटक; 37 मोबाईल फोन जप्त

गर्दीचा फायदा घेण्यासाठी अनेक चोरटे देखील गोव्यात सक्रिय झाले.
Goa Police
Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

नाताळ, सनबर्न फेस्टिव्हल आणि नवीन वर्षाच्या स्वागताला गोव्यात पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी अनेक चोरटे देखील गोव्यात सक्रिय झाले. यामध्ये सर्वाधिक चोरी झाले ते मोबईल फोन्स, सनबर्न फेस्टिव्हलमध्ये महागडे फोन चोरी करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या त्यापैकी दोन आंतरराज्य टोळ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच, नवीन वर्षाच्या स्वागताला देखील अनेक मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. दरम्यान, गोवा पोलिसांनी अनेक चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन्स जप्त केले.

Goa Police
South Goa: सुखद बातमी! दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांसाठी दक्षिण गोवा रूग्णालयात खास सेवा

पणजी पोलिसांनी कर्नाटक येथील चार चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. इशा भोई, मंजुनाथ जाधव, महेश काळे आणि रोहित जाधव (सर्व राहणार कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व मोबाईल फोन्स दोन लाख 40 हजार रूपये किंमतीचे आहेत.

Panaji Police
Panaji Police Dainik Gomantak
Goa Police
Goa Petrol-Diesel Price: नो चेन्ज! गोव्यातील पेट्रोल- डिझेलचे दर जैसे थे, जाणून आजचे भाव

बिहार येथील एकजण ताब्यात

दक्षिण गोवा पोलिसांनी कोलवा येथून एका बिहारी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सोळा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अकबर आलम असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडील मोबाईल फोन्स महागडे आहेत. पोलिसांनी संबधित मालकांना संपर्क केला असून, त्यांना मोबाईल परत केले जाणार आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Colva Police
Colva Police Dainik Gomantak
Goa Police
Vasco: सिलिंडरचा स्फोट होऊन फूड ट्रक जळुन खाक

म्हापसा पोलिसांनी देखील उत्तर प्रदेश येथील एका मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. साद्दिक हुसेन असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दीड लाख किमतीचे सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Mapusa Police
Mapusa Police Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com