Konkan Railways RoRo Train Dainik Gomantak
गोवा

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Konkan Railways RoRo Train: प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी कोकण रेल्वेने महाराष्ट्र आणि गोवा दरम्यान खास 'रो-रो' (Roll-On-Roll-Off) ट्रेन सेवा सुरु केली आहे.

Manish Jadhav

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी कोकण रेल्वेने महाराष्ट्र आणि गोवा दरम्यान खास 'रो-रो' (Roll-On-Roll-Off) ट्रेन सेवा सुरु केली आहे. ही विशेष ट्रेन महाराष्ट्रातून आपला पहिला प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करुन रविवारी (24 ऑगस्ट) गोव्यात पोहोचली, ज्यामुळे गणेशचतुर्थीसाठी आपल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

पहिल्या प्रवासात पाच गाड्या आणि १९ प्रवासी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ने सुरु केलेल्या या सेवेचा उद्देश प्रवाशांना आपल्या स्वतःच्या कारसह रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा देणे हा आहे. या 'रो-रो कार' ट्रेनचा पहिला प्रवास शनिवारी (23 ऑगस्ट) रायगड जिल्ह्यातील कोलाड स्टेशन येथून दुपारी 3.40 वाजता सुरु झाला. 10 कारचे डबे आणि दोन प्रवासी डबे असलेल्या या ट्रेनमध्ये पहिल्या प्रवासात 5 गाड्या आणि 19 प्रवासी होते.

दरम्यान, या गाड्यांपैकी चार गाड्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवलीजवळील नंदगाव येथे उतरवण्यात आल्या, तर एक गाडी दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे उतरवण्यात आली. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एक वातानुकूलित (एसी) कोच आणि एक 'सेकंड सीटिंग कोच' उपलब्ध करुन देण्यात आला होता. यामुळे प्रवाशांनी आरामदायक प्रवास केला आणि त्यांच्या गाड्याही सुरक्षितपणे ट्रेनमध्ये ठेवल्या गेल्या.

‘रो-रो’ सेवेचा उद्देश आणि रेल्वेचे मत

या सेवेबाबत बोलताना केआरसीएलचे उप महाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, "हा प्रवास अशा कुटुंबांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता ज्यांनी आपल्या स्वतःच्या कारसह रेल्वेने प्रवास केला." गणेशोत्सवादरम्यान रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या सेवेचा वापर करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

घाटगे यांनी पुढे सांगितले की, या सेवेच्या पुढच्या प्रवासाचा निर्णय लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या सोयीनुसार घेतला जाईल. या यशस्वी पहिल्या प्रवासाने कोकण रेल्वेसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

प्रवासाचे शुल्क आणि नोंदणी

कोकण रेल्वेने शनिवारी जारी केलेल्या एका प्रेस रिलीझमध्ये या सेवेच्या शुल्काची आणि नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. 11 सप्टेंबरपर्यंत सर्व 'रो-रो' कार वाहतूक सेवा प्रवासांसाठी नोंदणी स्वीकारली जाईल. प्रवासाच्या तारखेला वगळून प्रवासाच्या तारखेच्या तीन दिवस आधी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. कोलाड ते वेर्णापर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना प्रति गाडी 7,875 रुपये आणि कोलाड ते नंदगावपर्यंतच्या प्रवासासाठी 5,460 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क दोन्ही स्थानकांमधील प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन निश्चित करण्यात आले आहे.

तसेच, या विशेष सेवेमुळे प्रवाशांना महामार्गावरील वाहतूक कोंडी, थकवा आणि अपघातांचा धोका टाळून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने सुरु केलेली ही सेवा निश्चितच एक वरदान ठरणार आहे. ही सेवा भविष्यात नियमितपणे सुरु राहिल्यास कोकण आणि गोव्यातील प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT