Goa Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway : प्रखर विरोधानंतर रेल्वेची ‘रेंट अ बाईक’ची निविदा रद्द; व्यावसायिक आक्रमक

Konkan Railway : : मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल : विरोधी पक्षांचाही होता आक्षेप

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway :

मडगाव, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून राज्यातील विविध स्थानकांवर रेंट अ बाईक सेवा देण्यासाठी निविदा जारी केली होती. मात्र, तिला गोव्‍यातील व्‍यावसायिकांकडून प्रखर विरोध झाल्‍यानंतर कोकण रेल्‍वेने या निविदा रद्द करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्‍वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक झा यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही निविदा रद्द करण्यात आली. स्थानिक व्यावसायिकांच्या पोटावर पाय येणार असल्याने राज्य सरकारने दखल घेत ही निविदा मागे घेण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी स्थानिक रेंट अ बाईक व्यावसायिकांनी, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष तथा

आमदार विजय सरदेसाई, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासह इतरांनी केली होती. दक्षिण गोवा व उत्तर गोवा रेंट अ बाईक असोसिएशनतर्फेही हीच मागणी केली होती. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून कोकण रेल्वे मार्गावरील सात स्थानकांवर रेंट-अ-बाईक सेवा चालवण्यासाठी ऑपरेटरची निविदा जारी केलेली होती.

गोव्यातील मडगाव, थिवी, करमळी, काणकोण यासह कर्नाटक राज्यातील कारवार, गोकर्ण रोड आणि कुमटा रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू होणार होती. सर्व सात स्थानकांवर एकाच कराराद्वारे ‘रेंट ए बाईक’चे कंत्राट चालविले जाणार होते. १८ जून ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती.

महामंडळाने आमची मागणी ऐकून निर्णय बदलला, ही चांगली गोष्‍ट आहे. मात्र, तरीही आम्‍ही सतर्क राहणार आहोत. कारण या सरकारला मागच्‍या दाराने प्रकल्‍प पुढे आणण्‍याची सवय आहे. येथेही तसेच होऊ नये, यासाठी डोळ्‍यांत तेल घालून आम्‍ही सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहोत.

- विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड.

संचालकांशी चर्चा यशस्वी

सोमवारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकण रेल्वेने काढलेल्या ‘रेंट अ बाईक’संदर्भातील निविदेवर चर्चा केली. त्यानुसार आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून रेंट अ बाईक निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा उपप्रबंधक बबन घाटगे यांनी दिली.

‘कोरे’चा निर्णय याेग्‍यच

काेकण रेल्‍वे महामंडळाचे काम हे बाईक्‍स आणि गाड्या भाड्याने देण्‍याचे नसून त्‍यांचे मुख्‍य काम रेल्‍वे व्‍यवस्‍थितपणे चालविणे हे आहे. त्‍यांनी रेल्‍वे वेळेवर कशा नियोजितस्‍थळी पोहोचतील हेच पाहावे. कोकण रेल्‍वेने स्‍थानिक व्‍यावसायिकांच्‍या पोटावर पाय देणारा हा धंदा बंद करावा अशी मागणी केली होती, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

अग्रलेख: ..दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा! दरोड्यांच्या मालिकेने 'गोव्याची शांतता' छिन्नविच्छिन्न केली आहे

Birsa Munda: भगवान बिरसा मुंडा 'मानवतेचे प्रतीक' होते, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून तवडकर यांनी जो मार्ग दाखवला तो गोवाभर पसरला आहे

SCROLL FOR NEXT