Konkan Railways

 

Dainik Gomantak

गोवा

कोकण रेल्‍वेचे ‍विद्युतीकरण मार्च महिन्‍यापर्यंत पूर्णत्वास

95 टक्के काम पूर्ण : प्रदूषणविरहीत सेवेचे बोर्डाकडून लक्ष्‍य

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कोकण रेल्वेच्या गोव्यातील मार्गाचे विद्युतीकरण 95 टक्के पूर्ण झाले आहे. पेडणेपासून लोलयेपर्यंत आलेल्या 103 कि.मी. अंतर कामावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे. हा प्रकल्प मार्च 2022 मध्ये पूर्ण होणार असल्याने गोमंतकीयांना विजेवर चालणाऱ्या प्रदूषणविरहीत रेल्‍वेने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

कोकण रेल्वेतर्फे (Konkan Railways) महाराष्ट्र ते कर्नाटक पर्यंत 743 कि.मी. अंतर मार्गाचे पूर्णतः विद्युतीकरण करण्यात येणार असून महाराष्‍ट्रातील (Maharashtra) रत्नागिरीपासून गोव्यातील वेर्णापर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्‍याबाबत रेल्‍वे अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत चाचणी केली आहे. त्‍यांनी रेल्वे विद्युतीकरणाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे.

वेर्णापासून गोव्यातील दक्षिण सीमेलगत असलेल्या लोलयेपर्यंतच्या आणि कर्नाटकातील (Karnataka) कारवार रेल्वे स्टेशन मार्गावरील रुळावरील विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

कर्नाटकमधील ठोकूर रेल्वे स्‍थानक ते कारवार पर्यंतचे आणि महाराष्ट्रातील रोहा ते रत्नागिरी रेल्वे स्‍थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाला कमिशनर रेल्वे सेफ्टीतर्फे सहमती मिळाली आहे. गोव्‍यासह (Goa) महाराष्‍ट्र आणि कर्नाटक मिळून 743 कि.मी. अंतराच्‍या या प्रकल्पाच्या कामाचा अंदाजे खर्च 1100 कोटी रुपये असा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT