Konkan Railway Trains  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर 4 डिसेंबरला अडीच तासांचा मेगाब्लॉक; वास्को-यशवंतपूर गाडी सुटणार उशिरा

इतरही दोन गाड्यांच्या वेळांवर परिणाम

Akshay Nirmale

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे ते माजोर्डा या विभागातील रेल्वे रूळ तसेच इतर देखभालीच्या कामांसाठी 4 डिसेंबर रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तीन गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. कोकण रेल्वेने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

गाडी क्र. 17310 वास्को द गामा - यशवंतपूर जंक्शन एक्स्प्रेस गाडीचा 4 रोजी सुरू होणार्‍या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल केला असून ही गाडी नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिरा म्हणजे 23.25 वा. वास्को द गामा येथून सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

कोकण रेल्वेने म्हटले आहेकी, मडुरे माजोर्डा या ठिकाणांमध्ये सोमवारी, 5 डिसेंबर रोजी 21.25 ते 23.55 या वेळेत 2.30 तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी)- तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा 4 रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी - सावंतवाडी रोड विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाणार आहे.

गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा 4 रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी - कुडाळ विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT