Konkan Railway Theft Case Dainik gomantak
गोवा

कोकण रेल्वे सोने चोरी प्रकरण! बेळगावातून आणखी एकाला अटक; 34 लाख किंमतीचे सोने आणि कॅश जप्त

कोकण रेल्वेत चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत, पोलिसांनी चारजणांना अटक केली होती.

Pramod Yadav

Konkan Railway Theft Case: कोकण रेल्वेत चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत, पोलिसांनी चारजणांना अटक केली होती, तसेच त्यांच्याकडून तब्बल एक कोटी किंमतीचे सोने आणि 50 हजारांची रोकड जप्त केल होती.

याप्रकरणी बेळगावातून आणखी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून तीस लाख किंमतीचे सोने आणि चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

संतोष शिरतोडे (रा. बेळगाव, कर्नाटक) असे या संशयिताचे नाव आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक कोकण रेल्वे पोलिसांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी चार जणांना अटक केली होती. त्यानंतर ही पाचवी अटक आहे.

यापूर्वी संदीप वसंत भोसले (वय 40, रा. कवठे महाकाळ) व अक्षय राम चिनवल (वय 28, मूळ रा. खानापूर, बेळगाव) या दोघांना 28 जून रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर यामध्ये अर्चना मोरे (वय 42, रा. तलोजा, नवी मुंबई) हिचे नाव पुढे आले.

काय आहे प्रकरण

02 मे 2023 रोजी काणकोण रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी तब्बल 4 कोटी रुपये किमतीचे 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञातांकडून चोरी करण्यात आली.

संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संशयितांना अटक करून सोने जप्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT