Railway Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway: ‘कोकण रेल्वे’ आता सुसाट! उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक लागू; जाणून घ्या बदल

Kokan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्‍हेंबरपासून उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू करण्‍यात आले. गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किमी राहील. यामुळे या मार्गावर वेगवान गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

New Timetable for Konkan Railway Trains Starting November 1

सासष्‍टी: कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक पावसाळी व उन्हाळी अशा दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर ते ९ जून असे उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू केले जाते. तर पावसाळी हंगामासाठी गाड्यांचा वेग कमी केला जातो व १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो. १ नोव्‍हेंबरपासून उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू करण्‍यात आले.

उन्हाळी वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किमी राहील. यामुळे या मार्गावर वेगवान गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तर तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव येथून सायंकाळी ७ सुटून सावंतवाडीला ८.३८ वा., कुडाळ ९ वा., सिंधुदुर्गनगरी ९.१४ वा., कणकवली ९.३० वा. आणि वैभववाडीला ९.५६ वा. सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वा. पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी ३.०५ वा. सुटून सावंतवाडीला दुपारी ४.२४ वा., कुडाळ ४.४२ वा., कणकवली ५.०४ वा. येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वा. सुटून कणकवलीला सायंकाळी ४.२० वा. येणार आहे. मांडवी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ९.१५ वा. सुटून सावंतवाडीला १०.४२ वा., कुडाळ ११.४ वा., सिंधुदुर्गनगरी ११.१७ वा., कणकवली ११.३२ वा. तर वैभववाडीला ११.५८ वा. येणार आहे.

माहिती घेऊन प्रवास करा!

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने गोव्याला येतात. यात देशी पर्यटक अधिक असतात. तसेच डिसेंबर महिन्यात नाताळाची सुट्टी येईल, मग गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे कोकण रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT