Konkan railway police rescue Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: पोलिसांना सलाम! घरातून पळून गाठले गोवा, एका वर्षात 24 अल्पवयीन मुलांची 'घरवापसी'

Goa Railway Police: गेल्या वर्षभरात कोकण रेल्वे पोलिसांनी २४ लहान मुलांना वाचवलं आहे

Akshata Chhatre

मडगाव: गोव्याच्या शेजारी राज्यांमधून रेल्वेने गोव्यात येणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वे पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांमधून रेल्वेने गोव्यात आलेल्या २४ लहान मुलांना पुन्हा त्यांच्या राज्यांमध्ये सुरक्षित पाठवलं आहे, यामध्ये काही मुलींचा देखील समावेश होता. पोलिसांनी स्थानकावर सापडलेल्या अशा पळून आलेल्या मुलांची रवानगी 'आपना घर'मध्ये केली होती.

कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याची शेजारी राज्य जसे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधून ही मुलं गोव्याला येतात. शेजारी राज्यांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव आणि गरिबीमुळे त्यांच्या पालकांकडून पोलीस स्थाकांमध्ये याबद्दल तक्रार देखील नोंदवली जात नाही. पोलिसांना ही मुलं सापडताच त्यांनी लहानग्यांची चौकशी केली आणि त्यांचा पत्ता शोधून तिथल्या पोलिसांच्या मदतीने पुन्हा घरी पाठवून दिलं.

कोकण रेल्वे पोलिसांचे निरीक्षक सुनील गुडलार यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकांवर पोलिसांकरवी नियमित गस्त ठेवली जाते तसेच एकटे प्रवास करताना आढळलेल्या अल्पवयीन मुलांची चौकशी करणं हा पोलिसांचा पहिला प्रयत्न असतो आणि म्हणूनच अशा लहानग्या मुलांना परत पाठवण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.

मडगावच्या रेल्वे स्थनाकावर सापडलेल्या मुलांची चौकशी करताच यांपैकी बहुतांश जणांनी घरून पळून आल्याची माहिती उघड केली. यानंतर पोलिसांनी बालकल्याण समितीची मदत घेतली असल्याचे त्यांनी नमुद केले.

अलीकडेच कोकण रेल्वे पोलिसांनी त्रिशूर येथील तीन आणि केरळमधील पट्टांबी येथील एका अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना केरळ पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. पोलिसांच्या या उत्तम कामगिरीबद्दल बायलांचो एकवट या गटाच्या अध्यक्षा अवदा व्हिएगास यांनी कोकण रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. घरून पळून आलेल्या अशा लहान मुलांचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो आणि हे प्रकार रोखणं देखील रेल्वे पोलिसांच्या हातात असल्याचं त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT