Vande Bharat Konkan Railway Konkan Railway Instagram Account
गोवा

Kokan Railway: कोकण रेल्वेची रेकॉर्डब्रेक कमाई! १७०० कोटींचे प्रकल्प, या दोन बोगद्याचे काम लवकरच

Kokan Railway Corporation Limited: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासुनचा सर्वाधिक निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षांत केला. पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केले असून हे काम लवकरच सुरु होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Kokan Railway Net Profit New Projects

सासष्टी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासुनचा सर्वाधिक निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षांत केला. २०२३-२४ साली कॉर्पोरेशनला ४७०० कोटी रुपयांची उलाढाल झाली व ३०१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या ३४ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात देण्यात आली.

हा सोहळा मडगावच्या रवींद्र भवनात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात १५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा, संचालक राजेश भडंग, आर. के. हेगडे हे मान्यवर उपस्थित होते.

संतोष झा यांनी सांगितले की पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केले असून हे काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या त्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला १७९५१ रुपयांचा सानुग्रह जाहीर केला आहे.

दरम्यान, संचालक राजेश भडंग यांनी कोकण रेल्वेचा आर्थिक अहवाल सादर केला. कर्मचाऱ्यांसाठी ज्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत त्याची त्यांनी माहिती दिली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने कर्मचाऱ्यांसाठी हिंदी कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील निवडलेल्या १०० कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

आयएसओ प्रमाणपत्र

सहा महिन्यांत कॉर्पोरेशनला १७०० कोटी रुपयांचे प्रकल्प मिळाले. शिवाय कॉर्पेरेशनला दर्जा व्यवस्थापन सिस्टम, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्थापन, माहितीसाठी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

SCROLL FOR NEXT