Mumbai Margao Vande Bharat Train  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: पावसाळ्यात तीनच दिवस धावणार मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस; प्रवासाला लागणार 10 तासांचा वेळ

Mumbai Margao Vande Bharat Train Timetable: १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या काळात मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीनच दिवस धावणार आहे.

Pramod Yadav

Konkan Railway Mumbai Margao Vande Bharat Train

मुंबई: देशात मान्सून सक्रिय झाल्याने कोकण रेल्वेने ट्रेनच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आठवड्यातून सहा दिवस धावणारी मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मान्सूनच्या काळात केवळ तीनच दिवस धावणार आहे.

१५ जून २०२५ पासून नवे वेळापत्रक लागू होणार आहे. पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता ट्रेनचा वेग देखील कमी करण्यात आला असून, आता हा प्रवास दहा तासांत पूर्ण होणार आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या काळात मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीनच दिवस धावणार आहे. या काळात ट्रेनचा वेग देखील मंदावणार असून, ट्रेनला अंतर पूर्ण करण्यासाठी १० तास ०५ मिनिटांचा वेळ लागणार आहे.

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (Train Number 22229) Mumbai - Margao Vande Bharat Train)

मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन सकाळी ०५ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी असा प्रवास करत दुपारी ०१ वाजून १० मिनिटांनी मडगाव जंक्शनवर दाखल होईल. या प्रवासासाठी १० तास ०५ मिनिटांचा वेळ लागेल.

मडगाव – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Train Number 22230)

मडगाव जंक्शनवरुन दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुटणारी ही ट्रेन मुंबई सीएसएमटी स्थानकावर रात्री दहा वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल.

मान्सूनच्या काळात प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जातो. कोकण रेल्वेचा मार्ग घाटमार्गाचा असल्याने दरड कोसळण्याची शक्यता, निसरडा मार्ग, बोगदे यासह विविध बाबींचा विचार करुन वेळापत्रकात बदल केले जातात. प्रवाशांना कोकण रेल्वेच्या अद्यावत वेळापत्रकाबाबत माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in किंवा NTES या रेल्वेच्या मोबाईल अपला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Goa Live News Updates: सत्तरीत घरात घुसून, चाकू हल्लाकरत ऐवज लुटला

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT