Konkan Railway News Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: आरक्षित डबा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Mumbai Margao Express: मुंबई ते मडगाव जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. एक्सप्रेसमधील डिएल-०१ डबा आरक्षित होता.

Pramod Yadav

मुंबई: कोकण रेल्वेचा निष्काळजीपणा एका धक्कादायक घटनेमुळे उघडकीस आला आहे. एक्सप्रेसमध्ये असलेला आरक्षित डबा न जोडताच रेल्वे स्थानकावरुन धावली यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आरक्षित प्रवाशांना अखेर इतर डब्यात उभं राहून प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई ते मडगाव जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. एक्सप्रेसमधील डिएल-०१ डबा आरक्षित होता. यात अनेक प्रवाशांनी बुक केलेल्या तिकीटांच्या कन्फर्म सीट होत्या. पण, ऐनवेळी एक्सप्रेसमध्ये आरक्षित डबा जोडलाच नसल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांची धावपळ झाली. अखेर या प्रवाशांना इतर डब्यातून उभं राहून प्रवास करावा लागला.

रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवासी चांगलेच संतापले. संतप्त प्रवाशांनी तिकीट तपासणीस आणि अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. झालेल्या गैरसोयीचे कथन केले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करावी, असा सल्ला दिला. घडलेला प्रकार संतापजनक असल्याचे म्हणत प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी रेल्वेच्या तिकीटांचे आगाऊ बुकिंग करतात. पण, रेल्वेकडून तो डब्बा जोडला नाही तरी यासाठी जाबबदार कोणाला धरावे? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT