Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Konkan Railway Modernization Plan: कोकण रेल्वेने आपल्या मार्गावरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी एक मोठा प्लॅन तयार केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कोकण रेल्वेने आपल्या मार्गावरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी एक मोठा प्लॅन तयार केला आहे. पुढील ५ वर्षांत तब्बल ४,७०४ कोटी रुपये खर्च करून रेल्वे मार्गाचा कायापालट केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये गोव्यातील रेल्वे सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे.

त्याच बरोबर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला आता ८ ऐवजी १६ डबे जोडले जातील.

कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. यामध्ये वैभववाडी ते मडगाव दरम्यानच्या १५१ किमी मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे.

याशिवाय ट्रेन क्रॉसिंग सोपे करण्यासाठी मये आणि नेवरा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन्स बनणार असे त्यांनी सांगितले. या शिवाय ९९.४ कोटी रुपये खर्चून मदुरे, पेडणे आणि ओल्ड गोवा बोगद्याच्या शेजारी नवे समांतर बोगदे बांधले जातील. मडगाव ते लोलये दरम्यान जुने झालेले रेल्वे ट्रॅक बदलण्याचे काम केले जाईल.

सुरक्षेसाठी ‘एआय’चा वापर

पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. अपघात रोखण्यासाठी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ‘कवच’ ही स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बसवली जाईल. या सर्व सुधारणांमुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे, असे झा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT