Konkan Railway Gold Heist  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: धावत्या कोकण रेल्वेत सोने चोरी प्रकरण: सांगलीतून आणखी दोघांना अटक

सांगलीतून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक कार आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.

Pramod Yadav

Konkan Railway: धावत्या कोकण रेल्वेत चोरी प्रकरणी आणखी दोघांना कोकण रेल्वे पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. सोने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी यापूर्वी पाच जणांन अटक केली आहे.

सांगलीतून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक कार आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अतुल कांबळे (वय 39) आणि महेंद्र उर्फ महेश माने (वय 30) (दोघेही रा. सांगली) यांना कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, पोलीस शिपाई अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेड्डी आणि समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

त्यांच्याकडून खानापूर येथून सोने नेण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा लोगन चारचाकी जप्त करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी याप्रकरणी बेळगावातून एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीस लाख किंमतीचे सोने आणि चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

02 मे 2023 रोजी काणकोण रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी तब्बल 4 कोटी रुपये किमतीचे 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञातांकडून चोरी करण्यात आली.

संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संशयितांना अटक करून सोने जप्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

Goa Live News: वागातोरला होडी उलटली; तिघांना वाचवले

SCROLL FOR NEXT