Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: फुकट्यांवर कोकण रेल्वेची कारवाई, तीन महिन्यांत 5.60 कोटींचा दंड वसूल

कारवाई चालूच: १८ हजार ४६६ विनातिकीट प्रवाशांना दंड

सुशांत कुंकळयेकर

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधील तिकीट तपासणीसांनी फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून ५ कोटी ६० लाख ९९ हजार १७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतुन विनातिकीट प्रवास करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत एकूण १४१५० अनधिकृत व अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले व त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. यातून एकूण ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला.

यात २३ ऑगस्टपर्यंत ४४८४ विनातिकीट प्रवाशांकडून २६ लाख ६७ हजार ५५५ रुपये दंड वसूल केला गेला. २३ सप्टेंबरपर्यंत ४८८८ विनातिकीट प्रवाशांकडून २७ लाख ९ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला. २३ ऑक्टोबरपर्यंत ४७७८ प्रकरणे नोंद करत ३२ लाख ६० हजार ५६५ रुपये दंड वसूल केला गेला.

नोव्हेंबरमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करत ७०१३ जणांवर कारवाई केली गेली व २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४५ रुपये दंड वसूल केला गेला. डिसेंबर महिन्यातही ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत १८,४६६ विनातिकीट प्रवाशांकडून ५ कोटी ६० लाख ९९ हजार १७ एवढ्या मोठया प्रमाणात दंड वसूल केलेला आहे. सरासरी काढली असता प्रति फुकट्या प्रवाशाकडून ३०३७ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुढील कालावधीत ही तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT