konkan railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एका वर्षात 21.17 कोटींचा दंड वसूल

Konkan Railway Fine Collection: आर्थिक वर्षे 2023- 24 या काळात 78,115 प्रकरणे समोर आली.

Pramod Yadav

Konkan Railway Fine Collection

रेल्वेतून विनातिकीट फुकट प्रवास करणाऱ्यांविरोधात कोकण रेल्वेने कारवाई केली असून, गेल्या आर्थिक वर्षात 21.17 कोटींचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तिकीट तपासणीत 78,115 प्रवाशांकडे कोणत्याही प्रकारचे तिकीट नसल्याचे आढळले आहे.

कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. आर्थिक वर्षे 2023- 24 या काळात 78,115 प्रकरणे समोर आली. यातून कोकण रेल्वेने 21.17 कोटींचा दंड वसूल केला आहे.

प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्नशील असते. मात्र, काही प्रवाशी विना तिकीट रेल्वेतून प्रवास करतात. कोकण रेल्वेने गेल्यावर्षी फुकट्यांना चाप बसविण्याचा चांगला प्रयत्न केला होता. पण, यावर्षी पुन्हा यात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

कोकण रेल्वेने कारवाई करत यावर्षी 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.

कोकण रेल्वेतून गोव्यात अथवा कोकणात येणाऱ्या पर्यटक व स्थानिकांचा ओघ मोठा असतो. यात अनेकजण विनातिकीट प्रवास करताना पकडले जातात. रेल्वे प्रशासन अशा फुकट्यांना चांगलाच धडा शिकवत असते. एप्रिल महिन्यात तब्बल 2.70 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT