Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway : कोकण रेल्वेच्या ‘रेंट अ बाईक’ची निविदा रद्द करा; कळंगुट येथे स्थानिक व्यावसायिक एकवटले

Konkan Railway : कोकण रेल्वे महामंडळाच्या बाईक आणि कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway :

म्हापसा कोकण रेल्वेने विविध रेल्वे स्थानकांवर ‘रेंट-अ -बाईक’ व ‘ईव्ही’ कार सेवा सुरू करण्याची जी योजना आखून जाहिरात काढली आहे, त्यास विरोध करताना आज शनिवारी कळंगुट येथे मोठ्या संख्येने स्थानिक रेंट अ बाईक आणि टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्यांनी एकत्रित येत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.

यासंदर्भात स्थानिक व्यावसायिक हे सोमवारी (ता.३) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.

सरकारने या व्यवसायात असलेल्या स्थानिकांना पाठिंबा द्यायला हवाय. कोकण रेल्वे आता या व्यवसायात उतरू पाहत असल्याने आम्हाला नुकसानीची भीती आहे, कारण ही सेवा अस्तित्वात आल्यास स्थानिकांच्या रोजगारावर गडांतर येईल, अशी भीती स्थानिक व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

कोकण रेल्वे महामंडळाच्या बाईक आणि कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेने कारवार, काणकोण, मडगाव, करमळी आणि थिवी येथे रेंट-अ-बाईक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ऑपरेटर मिळविण्याकरिता निविदा जारी केली होती. यावेळी बोलताना रस्किन मस्करेन्हास म्हणाले की, कोकण रेल्वे महामंडळाच्या बाईक आणि कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाह धोक्यात येईल.

व्यावसायिकांच्या मनात भीती

सुदीप ताम्हणकर म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांना परमिटच्या अटींमधून सूट दिली आहे. तसे परिपत्रक केंद्रीय वाहतूक खात्याने काढले आहे. या पार्श्वभूमीवर एखादी कॉर्पोरेट कंपनी गोव्यात ईव्ही बसेस किंवा रेंट वाहनांचा व्यवसाय सुरू करू शकते.

ही भीती स्थानिक व्यावसायिकांना भेडसावत आहे. त्यामुळे सरकारने हे परिपत्रक रद्द करावे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे सरकारने आमच्यावर ओढवलेले संकट दूर करावे आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT