Pernem Tunnel Goa Konkan Railway X Handle
गोवा

Konkan Railway News: आणखी काही ट्रेन्स रद्द, काहींच्या मार्गात बदल; पेडणे बोगद्यातील कामाची ताजी अपडेट

Konkan Railway 12 Trains Cancelled: गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पेडणे बोगद्यात रेल्वे रुळांवर पाण्यासह चिखल साचला आहे.

Pramod Yadav

मंदूर- पेडणे येथील बोगद्यात चिखलमिश्रित पाणी साचल्याने रात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळावरील चिखल माती हटवून मार्ग सुरळीत करण्यात आला होता पण, पुन्हा एकदा त्या मार्गावर पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अजूनपर्यंत हे काम सुरुच असल्याने अनेक ट्रेन्सच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणे येथील बोगद्यातील चिखलमिश्रित माती हटविण्याचे काम सुरु असल्याचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली आहे.

दोन ट्रेन्स रद्द

ट्रेन क्रमांक १६३४५- लोकमान्य टिळक तिरुवनंतपुरम पूर्णपणे रद्द करण्यात आलीय.

तसेच, ट्रेन क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक मंगळुरु सेंट्रल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.

त्यापूर्वी कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई (मांडवी एक्सप्रेस), मडगाव - सावंतवाडी लोकल, मडगाव - मुंबई (तेजस एक्सप्रेस), मडगाव - मुंबई (जनशताब्दी एक्सप्रेस) आणि सांवतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेस रद्द केली.

मार्ग बदललेल्या ट्रेन्स

- श्री गंगानगर - कोचूवेली एक्सप्रेसच्या मार्गात बदल

- वास्को-द-गामा पटना जंक्शन एक्सप्रेसच्या मार्गात बदल

- तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या मार्गात बदल

- तिरुनेलवेल्ली - दादर एक्सप्रेसच्या मार्गात बदल

तर, मडगाव जंक्शन ते मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस सांवतवाडी येथून धावेल असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाण्यात उतरताना युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे, कुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

Smart Meter Controversy: वाढीव बिले तत्‍काळ माफ करा, दंडही रद्द करून अधिसूचना जारी करा; 'आप'ची सरकारकडे मागणी

Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

खासगी क्षेत्रातील कामगारांच्‍या किमान वेतनात अनुभवानुसार वाढ! कदंबसह 'माझी बस'च्‍या तिकिटातही सूट मिळणार; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

SCROLL FOR NEXT