Kolkata Doctor Rape Murder Case Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Rape Murder Case: भाजप महिला मोर्चाच्यावतीने मूक रॅली; बंगालमधील घटनेचा निषेध

Goa BJP Mahila Morcha: अध्यक्ष आरती बांदोडकर यांच्यावर पत्रकारांनी प्रश्‍नाचा भडिमार करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बंगालमध्ये महिला डॉक्टरचा छळ करून केलेल्या हत्त्येच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. राज्यात भाजपच्या महिला मोर्चाच्यावतीने या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी मूक रॅली काढण्यात आली. दरम्यान, अध्यक्ष आरती बांदोडकर यांच्यावर पत्रकारांनी प्रश्‍नाचा भडिमार करण्यात आला.

भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयापासून मूक रॅलीला सुरवात झाली. आझाद मैदानावर या रॅलीची समाप्ती करण्यात आली. समाप्तीनंतर या मोर्चाविषयी बांदोडकर म्हणाल्या, बंगालमध्ये डॉक्टर महिलेचा खून झाला, त्या महिलेला त्या राज्यात महिला मुख्यमंत्री असताना न्याय मिळत नाही. डॉक्टर युवतीचा खून नव्हे, तर आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचा निषेध म्हणून ही रॅली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सिद्धी नाईक खून प्रकरण असो की मणिपूरमधील महिला अत्याचार असो, अशावेळी भाजप महिला मोर्चाने कधीही रॅली काढली नाही की त्याचा निषेध नोंदविला नाही? हा तुमचा प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे का? असे वारंवार प्रश्‍न केले, तरी त्या-त्या वेळी आम्ही कार्यक्रम केले आहेत, मुख्यमंत्र्यांनी अशा घटना घडू नयेत म्हणून पावले उचलली आहेत, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

‘गोमेकॉतही डॉक्टर सुरक्षीत नाहीत’

सायंकाळी आझाद मैदानावर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने बंगालमधील घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी प्रतिमा कुतिन्हो, राम काणकोणकर, प्रजल साखरदांडे, प्रसाद पोळजी, ॲना ग्रासिएस, ग्लेन काब्राल यांच्यासह युवक-युवती उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांनी आपापली मते व्यक्त करीत निषेध व्यक्त केला. ग्रासिएस म्हणाल्या, गोमेकॉतही डॉक्टर सुरक्षीत नाहीत. अजूनही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत असे त्यांनी सांगत सिद्धी नाईकला अजूनही न्याय मिळाला नाही असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT