Margao District Hospital Protest  Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Case: काळ्या फिती बांधून रुग्णांची तपासणी! मडगावात डॉक्‍टरांचा मूक आक्रोश

South Goa District Hospital: हॉस्पिटलात ओपीडीसुद्धा चालू होती व रुग्णवाहिकाही उपलब्ध असल्याने रुग्णांचे किंवा सामान्य नागरिकांचे हाल झाले नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

कोलकाता येथील एका महिला डॉक्‍टरवर सामूहिक बलात्‍कार करून तिचा खून झाला. अशा घटना अन्‍यत्र घडू नयेत म्‍हणून देशभरातील डॉक्‍टरांनी आज आंदोलन केले. गोव्‍यातूनही निषेध नोंदवण्‍यात आला.

पश्र्चिम बंगालमध्ये एका हॉस्पिटलमधील युवा महिला डॉक्टरवर सामूहिक बलत्कारानंतर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांचा देशव्यापी संप पुकारला. त्यात गोव्यातील डॉक्टरही सहभागी झाले व त्यांनी ऐक्य दाखवले.

मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनीसुद्धा असोसिएशनच्या संपाला आपला पाठिंबा दर्शविला. मात्र, त्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून, हाताला काळ्या फिती बांधून रुग्णांची तपासणी चालू ठेवली. हॉस्पिटलात ओपीडीसुद्धा चालू होती व रुग्णवाहिकाही उपलब्ध असल्याने रुग्णांचे किंवा सामान्य नागरिकांचे हाल झाले नाहीत.

आज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सकाळी सर्व डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी एकत्र आले. त्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून नंतर कामाला सुरवात केली. या प्रसंगी डॉ. एडी डिमेलो यांनी सांगितले, की आम्ही बलत्कार करून हत्या केलेल्या युवा महिला डॉक्टरला श्रद्धांजली वाहतो. तिच्या कुटुंबियांप्रती आम्हाला सहानभुती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT