Kolhapur - Goa Flight Dainik Gomantak
गोवा

20 मिनिटात कोल्हापुरातून गोव्याला जाता येणार, थेट विमानसेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग

Kolhapur Goa Flight: गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून गोव्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

Pramod Yadav

Kolhapur - Goa Flight

पणजी: कोल्हापूर येथून गोव्याला थेट विमानसेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नवी विमानसेवा सुरु करण्याबाबत विमानतळ व्यवस्थापन आणि संबधित कंपनीकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास येत्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. विमानसेवा सुरु झाल्यात 20 ते 30 मिनिटात गोवा गाठणे शक्य होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावरुन सध्या मुंबई, हैद्राबाद येथे विमानसेवा सुरु आहे. नव्याने गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु झाल्यास प्रवाशांना केवळ 20 ते 30 मिनिटात गोव्याला जाता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून गोव्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीला आता लवकरच मूर्त स्वरुप येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर ते गोवा थेट विमानसेवा सुरु करण्यास विमान कंपनी देखील उत्सुक असल्याची माहिती आहे. याबाबत आवश्यक परवानगी आणि इतर प्रक्रिया सुरु आहे. वेळेत सर्व बाबी पूर्ण झाल्यास येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत ही विमानसेवा सुरु होईल, अशी शक्यता आहे.

यासह कोल्हापूर ते हैद्राबाद या मार्गावर आणखी एक विमान सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

कोल्हापूर - दिल्ली आणि अहमदाबादसाठी विमानसेवा

कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. दिल्लीसाठी एअरबस या विमान कंपनीची ट्रयल घेण्याबाबत सध्या काम प्रगतीपथावर आहे. दिल्लीसाठी २५ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरु करणे जवळपास निश्चित आहे. तसेच, बंद झालेली कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT