Lekhani Naik Kokedama Goa Dainik Gomantak
गोवा

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Lekhani Naik Goa: लेखणी नाईक कोकेडामाची कार्यशाळा अनेक ठिकाणी घेते. राज्यातील सर्व सरकारी तसेच काही खाजगी शाळांमध्ये, राष्ट्रीय कौशल्य योजनेचा भाग म्हणून कोकेडामाच्या कार्यशाळा तिने घेतल्या आहेत.

Sameer Panditrao

कोकेडामा हा जपानी शब्द आहे, ज्याचा शब्दशः अर्थ होतो शेवाळ्याचा गोळा. यात मातीचा गोळा शेवाळाने झाकला जातो व त्यावर शोभेच्या वनस्पती वाढवल्या जातात. जपानमध्ये कोकेडामा खूप लोकप्रिय आहे.

गोव्यात पाळी- साखळी येथील लेखणी नाईक कोकेडामाची कार्यशाळा अनेक ठिकाणी घेते. राज्यातील सर्व सरकारी तसेच काही खाजगी शाळांमध्ये, राष्ट्रीय कौशल्य योजनेचा भाग म्हणून कोकेडामाच्या कार्यशाळा तिने घेतल्या आहेत.  ती कोकेडामा आर्टिस्ट आहे त्याचबरोबर ती कृषी प्रात्यक्षिकेही देते, ज्यात पारंपरिक बागकामाला टिकाऊपणा आणि सर्जनशीलतेबरोबर जोडून एक नवीन रूप दिले जाते.

लेखणीला दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार लाभला आहे आणि 2024 च्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तिने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सुंदर आणि विघटनशील कोकेडामा तयार करण्यासाठी शेवाळ्याच्या जागी नारळाच्या काथ्याचा प्रयोग करून तिने तिची सर्जनशीलताही सिद्ध केली आहे. तिचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग नक्कीच प्रेरणा देणारा आहे. 

बागकाम ही लेखणीची लहानपणापासूनची आवड होती. तिने स्वतःची ही आवड आता एका 'मिशन'मध्ये विकसित केली आहे. बागेमधील प्लास्टिकचा कचरा कमी करणारे एक नवीन शाश्वत तंत्र तिने सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. तिच्या हातानी बनलेले कोकेडामा हे केवळ रोपट्यांचे आधार नाहीत तर ते पृथ्वीची काळजी घेणाऱ्या जिवंत जाणिवा आहेत.

रोपांवरच्या प्रेमातून लेखणीचा प्रवास सुरू झाला. लहानपणी रोपटी आपल्याला समजू घेऊ शकतात असे तिला वाटायचे आणि मग हा बंध हळूहळू अधिकच मजबूत होत गेला. स्थानिक औषधी आणि जंगलातील वेगवेगळ्या वनस्पती गोळा करण्याचा आपला छंद विकसित करता करता पर्यावरण-सजग बागकामाला प्रोत्साहन देणे हे तिचे आजीवन मिशन बनले.

घरगुती रोपट्यांचा तिचा वैयक्तिक संग्रह आता राज्यात एक पुरस्कार प्राप्त बगीचा बनून बहरला आहे. ती म्हणते, 'जेव्हा एक कोकेडामा मी रोपट्याभोवती गुंडाळत असते तेव्हा मी जणू धरती मातेचेच पालनपोषण करत आहे असेच मला वाटते.'

प्लास्टिकच्या कुंड्यांना कोकेडामा हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.‌ कोकेडामा कलेचा वापर करून आता लेखणी त्यांना गोलाकाराऐवजी पारंपरिक कुंड्यांचा आकार देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करते आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्याचा प्रयोग ती करते आहे. कोकेडामा ही कला केवळ कलात्मकतेचा पुरस्कार करत नाही तर ती जीवनदेखील पुनर्संचयित करते- कोणताही कचरा मागे न ठेवता माती समृद्ध करून कोकेडामाचे जीवनचक्र संपते.

रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता माजोर्डा येथील कार्पे दियेममध्ये लेखणी हिची कोकेडामा कलेवर कार्यशाळा आयोजित केली गेली आहे.‌ कोकेडामा कला ही हरित जगण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

SCROLL FOR NEXT