Dak Adalat Goa: टपाल वस्तूंचे वितरण, मनीऑर्डर, बचत खात्याच्या समस्या सुटणार; पणजीत होणार 63 वी 'डाक अदालत', कसा अर्ज करायचा? वाचा

Post Office Panaji Goa: डाक अदालतीत गोवा विभागाशी संबंधित टपाल सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींची सुनावणी केली जाणार आहे.
Dak Adalat Goa
Dak Adalat GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर: पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन (पणजी) यांच्या वतीने येत्या 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात 63 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.

या डाक अदालतीत गोवा विभागाशी संबंधित टपाल सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींची सुनावणी केली जाणार आहे. ज्या तक्रारींवर सहा आठवड्यांपर्यंत निवारण झाले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशा प्रकरणांची या अदालतीत दखल घेतली जाईल.

विशेषतः टपाल वस्तूंचे वितरण, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्रे आदी विषयांवरील तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत.

तक्रारदारांनी आपली तक्रार सादर करताना आवश्यक सर्व तपशील देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा व मूळ तक्रार कुणाकडे पाठविली याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

संबंधितांनी आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन, पणजी - 403001 या पत्त्यावर दोन प्रतींसह 20 सप्टेंबरपर्यंत पाठवावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार अदालतीत केला जाणार नाही, असंही अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Safety Goa
Goa teacher sentenced 11 years
Bombay High Court Goa Bench
Mala Lake
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com