Kokani Bhasha Mandal Purskar: कोकणी भाषा मंडळाचे यंदाचे पुरस्कार जाहीर केले असून ज्येष्ठ कोकणी साहित्यिक पांडुरंग काशिनाथ गावडे यांना भाषा मंडळाचा प्रतिष्ठेचा सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता मडगावातील गोमंत विद्या निकेतनमध्ये होणाऱ्या मंडळाच्या 61 व्या वर्धापनदिन कार्यक्रम त्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष अन्वेशा सिंगबाळ यांनी दिली.
मंडळाने जाहीर केलेले अन्य पुरस्कार खालील प्रमाणे
फेलिस्यु कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार काश्मिरी समीर पावस्कर यांना, जुझे पियेदाद क्वाद्रूस स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार हरीश कृष्णा कामत यांना, लिगोरियो फुर्तादो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार फा. जुझे डायस यांना, चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार सुहासिनी प्रभुगांवकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
साहित्य पुरस्कारामध्ये रामनाथ मणेरकर स्मरणार्थ अनुवादक पुरस्कार डॉ. मिलिंद म्हामल (पुस्तक : भारतीय तत्वगिन्यानाचो इतिहास) यांना, नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार मिनीन आल्मेदा (पुस्तक- शिम आनी मेर) यांना, रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार प्रा. वसंत सैल (पुस्तक- कोमुल) यांना जाहीर झाला आहे.
रमेश वेळुस्कर स्मृती साहित्य पुरस्कार उदय नरसिंह म्हांबरो (पुस्तक : काळीज उसवला) यांना, मनोहरराय सरदेसाई यांच्या स्मरणार्थ बालसाहित्य पुरस्कार उमेश मनोहर सरदेसाई (पुस्तक- हुंदीर बाबुले) यांना तर फा. मॉरेन डिसोझा स्मरणार्थ युवा साहित्य पुरस्कार डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांना प्राप्त झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.