Kochi Murder Case Dainik Gomantak
गोवा

कोची येथून 2021 साली बेपत्ता झालेल्या तरुणाचा गोव्यात खून, दोन वर्षांनंतर आरोपींची कबुली

तिघांच्या एका टोळीने ही हत्या केल्याची पुष्टी शनिवारी पोलिसांनी केलीय.

Pramod Yadav

कोची येथून 2021 साली बेपत्ता झालेल्या तरुणाचा गोव्यात खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुमारे दोन वर्षानंतर आरोपींनी याबाबत कबुली दिली आहे. तिघांच्या एका टोळीने ही हत्या केल्याचे शनिवारी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जेफ जॉन लुईस (वय 27, रा. एर्नाकुलम) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल चाको, स्टेफिन आणि विष्णू (रा. कोट्टायम, वायनाड) या तिघांना अटक केली आहे.

पूर्वीच्या वादातून तिघांनी मिळून जेफची हत्या केल्याचे कोची शहराचे पोलीस आयुक्त ए अकबर यांनी माध्यमांना सांगितले. अटकेतील तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांच्या वतीने घेतला जात आहे. असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोट्टायम वेल्लूर येथील अनिल चाको याच्याविरोधात यापूर्वी KAAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वेल्लूर पोलिसांनी दुसरा आरोपी स्टेफिनविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यातील संशयित विष्णू यांनी जेफ लुईस याच्या खूनाची कबुली दिली आहे. पूर्वीच्या जुन्या वादातून तिघांनी मिळून खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT