Sunburn Festival google image
गोवा

गोव्यातील यंदाच्या Sunburn Festival 2023 ची थीम माहितीय? 3 लाख संगीतप्रेमी येणार? जाणून घ्या सर्व काही...

हा 17 वा सनबर्न महोत्सव

Akshay Nirmale

Sunburn Festival 2023: दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत महोत्सव सनबर्नला आज, 28 डिसेंबरपासून गोव्यातील वागातोर येथे सुरूवात होत आहे. हा 17 वा सनबर्न महोत्सव आहे.

'एन्चँटेड फॉरेस्ट' अशी यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलची थीम आहे. या वार्षिक महोत्सवात उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च-ऑक्टेन मनोरंजनाचा समावेश यात असणार आहे. 28, 29 आणि 30 या दिवशी सनबर्न होत आहे.

वागातोर येथील सनबर्नच्या कार्यक्रमस्थळी उपस्थितांना उच्च-स्तरीय प्रतिभा, तल्लीन करणाऱ्या करमणूक उपक्रमांची मेजवानी आणि अनुकूल कार्निव्हल अनुभवण्याची संधी आहे.

जंगलाची गूढता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून यंदाची थीम 'एन्चॅन्टेड फॉरेस्ट' अशी केली आहे. गुंतागुंतीचे ऑडियो व्हिज्युअल डिझाईन्स आणि लायटिंग सिस्टिम वागातोरच्या आकाशाला उजळून टाकेल.

अक्राळविक्राळ सजीव, फुले, प्राणी, परी अशा प्रतिकृती येथे आहेत. यात अभिजातता आणि प्राचीन लोकसाहित्याचेही उत्कृष्ट मिश्रण आहे. माया आणि अॅझटेक कलेप्रमाणे निऑन थीम वापरून जबरदस्त ग्राफिटी आणि इन्स्टॉलेशन आर्टस या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळेल.

विविध कार्यक्रमांचे आकर्षण

28-31 डिसेंबर दरम्यान या काळात सनबर्नसाठी अंदाजे 3 लाख उपस्थितांची असण्याची अपेक्षा आहे. सनबर्नमध्ये या तीन दिवसांत 150+ हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशी उपक्रम होतील.

यात मनोरंजन राइड, कॅम्पिंग, आफ्टर-पार्टी, अॅडव्हेंचर झोन, फूड अँड बेव्हरीजीस व्हिलेज असे उपक्रम असतील. संस्थापक संघाने 7 अभूतपूर्व थीम असणार असल्याचे सांगितले आहे. उद्घाटन सोहळ्याबरोबरच कलात्मकतेच्या विस्तृत निवडीवरही आयोजकांनी लक्ष केंद्रित केले आहे.

सनबर्नचे सीईओ करण सिंग सांगतात, “सनबर्न गोव्याच्या 17व्या आवृत्तीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे आणि गोव्याच्या सुंदर वातावरणात “लाइव्ह, लव्ह आणि डान्स अगेन” साठी जगभरातील आमच्या चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

या वर्षीचा महोत्सव आधुनिक अवांत-गार्डे तंत्रज्ञान, मल्टीमीडिया तंत्रज्ञान आणि प्रकाश तंत्रांचा वापर यांचे मिश्रण पाहायला मिळेल.

व्यासपीठ

भव्य, उंच असे फुटबॉल मैदानाच्या आकाराचे स्टेज येथे असेल. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विपुल प्रकाश व्यवस्था असलेला सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक ध्वनी मंच असेल. हे सर्व घटक सनबर्न 2023 मधील उपस्थितांसाठी 'द एचँटेड फॉरेस्टची उर्जा देतील.

तिकिट

तिकिटे आज दुपारी 12 पासून www.bookmyshow.com वर लाइव्ह झाली आहे. तिकिटाच्या किंमती 7000 रूपयांपासून सुरू होत असल्याचे कळते. कॅम्पिंग, आफ्टर-पार्टीसाठी विशेष पॅकेजे आहेत. 'आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या' योजनेतून 50 टक्के हप्त्याचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.

क्रोमा सनबर्न गोवा 2023 हे ऍब्सोल्युट ग्लासवेअरने सादर केले असून जॅक आणि जोन्सने डिझाईन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

Goa Horticulture Development: गोव्यात आंबा, नारळ, काजू अन् बांबूसाठी स्वतंत्र मंडळे! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा नवा आराखडा

SCROLL FOR NEXT