Goa Carnival 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival : 'खा, प्या, मजा करा' असे सांगणारा गोव्यातील कार्निव्हलचा नेमका इतिहास काय?

गोव्याचा कार्निव्हल पर्यटकांचं आकर्षण ठरतो

Rajat Sawant

Goa Carnival : गोवा राज्य हे पर्यटनासाठी ओळखलं जाणारं राज्य आहे. मात्र, येथे होणारे कार्निव्हल हा पर्यटकांचं आकर्षण ठरतो. गोवा कार्निव्हल हा पोर्तुगीज राजवटीचा वारसा आहे.

कार्निव्हल हे नेत्रदीपक परेड, संगीत कार्यक्रम, स्वादिष्ट पदार्थ आणि इतर गोष्टींनी भरलेले आहे. कार्निव्हल फेस्टिव्हलमुळे गोव्यात उत्सवाचे वातावरण असते. गोव्यातील बीचवर संगीत आणि नृत्याचा अनोखा नजारा पाहायला मिळतो. तसेच विविध गोवन पदार्थांची चव देखील चाखता येते.

कार्निव्हलचा इतिहास

कार्निव्हल ही रोमन कॅथोलिक परंपरेची ओळख आहे. गोव्यात आल्यावर पोर्तुगीजांनी इथे कार्निव्हलला सुरुवात केली. ब्राझीलमधील रिओ दि जानिरोचा कार्निव्हल जगप्रसिद्ध आहे. तिथे पोर्तुगीजांचीच एक वसाहत होती. तेथे हा कार्निव्हल साजरा केला जायचा. रिओच्याच धर्तीवर गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलकडे बघितलं जातं.

Goa Carnival 2023

कार्निव्हल हा सार्वजनिक उत्सव आहे. कार्निव्हलचे प्रमुख आकर्षण हे परेड, कला आणि संस्कृती शो, स्वादिष्ट अन्न, रेड आणि ब्लॅक डान्स असते. गोवा कार्निव्हलच्या परंपरेनुसार, या कार्यक्रमाचा किंग मोमो (एक काल्पनिक पात्र) हा राजा असतो. तो संपूर्ण राज्यावर राज्य करत असतो. तो आदेश देतो “खा, प्या आणि मजा करा” तेव्हा कार्निव्हलच्या परेडला सुरुवात होते.

परेड

कार्निव्हलमध्ये परेड आयोजित केली जाते. या परेडमध्ये विवीध चित्ररथ, रंगीबेरंगी वेशभूषा आणि विविध मुखवटे परिधान केलेली माणसे, लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स असे विविध प्रकार परेडमध्ये पहायला मिळतात.

कला आणि संस्कृती शो

कार्निव्हल हा मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असलेला उत्सव म्हणून बघितला जातो. युरोपियन लोकसंस्कृतीचे प्रतीक म्हणून कार्निव्हलकडे बघितले जाते. पाश्चिमात्य आणि गोमंतकीय अशा दोन्ही संस्कृतीचा संगम कार्निव्हलमध्ये दिसून येतो. 

 रेड आणि ब्लॅक डान्स 

कार्निव्हलमध्ये रेड आणि ब्लॅक डान्सचा समावेश असतो. यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसह डान्सच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यावेळी हे कलाकार अतिशय अचूकतेने परफॉर्म करत असतात. त्यांना पाहणे हा खरच एक रोमांचक अनुभव असतो. गोवा कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

17 ते 21 फेब्रुवारीपर्यंत गोवा कार्निव्हल फेस्टिव्हल होणार साजरा

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गोवा कार्निव्हल फेस्ट आयोजित करण्यात येतो . यंदाचा गोवा कार्निव्हल 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चार दिवसीय गोवा कार्निव्हलचा 21 फेब्रुवारीला समारोप होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT