Goa Carnival 2023: गोव्याला नैसर्गिक सौदर्यांसह संस्कृतीचा वारसा लाभला आहे. गोवा पर्यटनासाठी खुप प्रसिध्द आहे. प्रत्येक ऋतूत पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. तसेच गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिना सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात गोव्यातील हवामान अतिशय आल्हाददायक असते.
यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गोवा कार्निव्हल फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यंदा १७ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून गोवा कार्निव्हल फेस्टिव्हलचे (Goa Carnival) आयोजन करण्यात येत आहे. तुम्हीही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे.
17 ते 21 फेब्रुवारीपर्यंत गोवा कार्निव्हल फेस्टिव्हल होणार साजरा
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गोवा कार्निव्हल फेस्ट आयोजित करण्यात येतो . यंदाचा गोवा कार्निव्हल १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चार दिवसीय गोवा कार्निव्हलचा 21 फेब्रुवारीला समारोप होणार आहे.
कुठे होणार गोवा कार्निव्हल फेस्टिव्हल ?
गोवा कार्निव्हल फेस्टिव्हल गोव्यातील पर्वरी, पणजी, म्हापसा, मडगाव, मोरजी आणि वास्को या सुंदर शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पणजी ही गोव्याची राजधानी आहे.
तुम्ही अजून गोवा कार्निव्हलला हजेरी लावली नसेल तर एकदा गोव्याला नक्की भेट द्या. कार्निव्हल फेस्टिव्हलमुळे गोव्यात उत्सवाचे वातावरण आहे. गोव्यातील बीचवर संगीत आणि नृत्याचा अनोखा नजारा पाहायला मिळतो.तसेच विविध गोवन पदार्थांची चव देखील चाखता येते.
प्रवेश शुल्क
तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकता. त्याच वेळी, रेड आणि ब्लॅक डान्सचे शुल्क फक्त 100 रुपये आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसह डान्सच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. गोवा कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.