Nagpur Goa Shaktipeeth Expressway:  Dainik Gomantak
गोवा

कसा आहे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती येणार खर्च? गोव्याला काय फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर...

2028-29 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता

Akshay Nirmale

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली.या एक्स्प्रेस वेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येईल, असे सांगितले जात आहे.

या एक्स्प्रेस वेला शक्तीपीठ एक्सप्रेस वे असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे.

हा महामार्ग भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली.

असा आहे मार्ग

  • लांबी 760 किलोमीटर

  • सहा पदरी द्रुतगती मार्ग

  • प्रकल्पाची अंदाजित किंमत 75,000 कोटी रुपये

  • समाविष्ट जिल्हे 11- यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा)

  • प्रवासाचा कालावधी- नागपूर ते गोवा दरम्यान 8 तास. प्रवासाचा वेळ 13 तासांनी कमी होणार.

  • मालकी- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)

  • कधी पूर्ण होणार - तारीख निश्चित्त नसली तरी हा एक्सप्रेसवे 2028 किंवा 2029 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

या एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 10 तासांनी कमी होईल. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ आधीच कमी झाला आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग 11 जिल्ह्यांतून धावणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला चालना मिळणार आहे.

9 मार्च 2023 रोजी नागपूरला गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्गशी जोडणारा या द्रुतगती मार्गाची घोषणा करण्यात आली होती.

शक्तीपीठे जोडणार

वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी या शक्तीपीठांना याद्वारे जोडले जात आहे. याशिवाय तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर ही शक्तीपीठे, अंबेजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहिब आणि प्रधानपूर येथील विठ्ठल कुमारी यासह इतर तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत.

यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव दिले गेले आहे. शक्तीपीठांसह विविध धार्मिक स्थळे जोडली गेल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळले.

ही पर्यटन स्थळे जोडणार

सेवाग्राम, कारंजा लाड, माहूर, औंढा, नागनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड, परळी वैजनाथ, अंबागोगाई, लातूर, उस्मानाबाद, अंबाबाई कोल्हापूर, संत बाळूमामाचे आदमापूर, कुणकेश्वर, पत्रादेवी

वेळेची बचत

एक्स्प्रेसवेने प्रवासाचा वेळ सरासरी 18 ते 21 तास लागतात. त्यावरून हा प्रवास आता केवळ 8 तासांवर येऊ शकतो. प्रवासाचा वेळ 13 तासांनी कमी होणार त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी तो गेम चेंजर ठरेल.

गोव्याला होणार लाभ

या एक्सप्रेसवेमुळे गोव्यातील मालमत्तांच्या किमतीतही वाढ होईल. तसेच, गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. कारण लोक 8 तासांत रस्त्याने प्रवास करून गोव्यात पोहचू शकतील.

नागपूर गोवा द्रुतगती मार्गाचे फायदे

  • व्यापारवाढ, आयात-निर्यात वाढीस मदत

  • धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल

  • मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांना वगळून गोव्याकडे जाण्याचा पर्यायी मार्ग

  • जलद वाहतूक, नागपूर ते गोवा प्रवासाला केवळ 8 तास लागतील. सध्या 21 तास लागतात.

  • ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प असल्याने हजारो झाडे महामार्गालगत लावली जातील.

  • रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT