Court  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात 26 वर्षापूर्वी सख्या भावावर चाकूहल्ला; 87 व्या वर्षी संशयिताची निर्दोष मुक्तता

हल्ल्यासाठी वापरलेला चाकू आजतागायत पोलिसांना सापडलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

गणेश चतुर्थीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सख्या भावावर चाकूहल्ला केल्याची घटना 1996 मध्ये फोंड्यात घडली होती. तब्बल 26 वर्षानंतर याप्रकरणी पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काशिनाथ नाईक असे त्यांचे नाव असून, ते सध्या 87 वर्षांचे आहेत.

काशिनाथ नाईक आणि त्यांचा भाऊ नीळकंठ यांच्यात 1997 साली गणेश चतुर्थीत किरकोळ कारणावरून वाद झाला. यात काशिनाथ यांनी नीळकंठ यांच्यावर चाकूहल्ला केला. याप्रकरणी रंगनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 7 सप्टेंबर 1997 रोजी फोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फोंडा पोलिसांनी काशिनाथ यांच्याविरोधात फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात 12 जून 1998 रोजी आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान, 20 मे 2016 मध्ये काशिनाथ यांना अटक झाली आणि 10 जून रोजी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. ऑगस्ट 2017 रोजी आरोप निश्चितीनंतर काशिनाथ यांच्याविरोधात खटला सुरू झाला

दरम्यान, तब्बल 26 वर्षानंतर याप्रकरणी पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हल्ल्यासाठी वापरलेला चाकू आजतागायत पोलिसांना सापडलेला नाही. तसेच, प्रत्यक्षदर्शीने जबाब फिरवल्याचे निरीक्षण नोंदवून संशयिताची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय चाकूहल्ला झालेले नीळकंठ यांचे आणि तक्रारदार यांचाही मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT