Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : माशेलात सुरीहल्ला; तीन जणांना अटक

गेल्या काही दिवसात फोंडा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून अजूनही त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : गोव्यात वाढती गुन्हेगारी सध्या पोलिसांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात फोंडा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून अजूनही त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. माशेलात एका व्यक्तीवर चाकूहल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र झाल्या प्रकाराने परिसरात मात्र भीतीचं वातावरण आहे.

माडापय माशेल येथे आज गुरुवारी सकाळी एका व्यक्तीवर चाकूहल्ला झाला आहे. यात संबंधित व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. संशयितांमध्ये सोमेश उर्फ नितीन धावजेकर, विराज राऊत आणि अनेश नाईक यांचा समावेश आहे. तिघेही कुंभारजुवा येथील रहिवासी असून पोलिसांनी हल्लाप्रकरणात त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

दुसरीकडे बागा येथे दोन पर्यटकांना धमकी देत गंभीर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यापैकी एका पर्यटकाचे हणजूण येथून अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दोन अज्ञात इसमांनी दोन पर्यकांची अडवणूक करून, त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पर्यटकांचा हणजूणपर्यंत पाठलाग केला आणि त्यापैकी एकाचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेण्यात आले. एका पर्यटकाने याबाबत कळंगुट पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT