Kiran Kandolkar Dainik Gomantak
गोवा

किरण कांदोळकर तृणमूल काँग्रेस सोडणार

पक्षाची फेररचना होण्यापूर्वीच पडझड, 14 पंचसदस्यांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीत फारसा परिणाम पाडू न शकलेल्‍या तृणमूल काँग्रेसला निवडणुकीनंतर लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. आता पक्षाच्‍या थिवी मतदारसंघातील उमेदवार आणि जिल्‍हा पंचायत सदस्‍य कविता कांदोळकर यांनी पक्षावर नाराजी व्‍यक्त करीत सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. परवा काँग्रेसच्‍या चेतना यात्रेतील बैठकीत काणकोणचे उमेदवार हजर झाल्‍याने लोकांना भुवया उंचावल्‍या होत्‍या. कांदोळकर यांच्‍यासह थिवी, अस्‍नोडा, रेवोडा आणि कामुर्लीच्‍या सरपंचांसह इतर चार उपसरपंच तसेच 14 पंचसदस्‍यांनीही तृणमूलच्‍या प्राथमिक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे.

कांदोळकर यांच्‍यासह समर्थकांनी दिलेल्‍या राजीनाम्‍यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे पक्षाची फेररचना करणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली असली तरी पक्षाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी अद्यापही पक्ष सोडला नाही, मात्र ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

कविता कांदोळकर यांनी पक्षाची कामगिरी आणि सध्‍याच्‍या कार्याला कंटाळून राजीनामा दिला आहे. सुरुवातीला जोमाने पक्षात आलेल्या अनेकांनी निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षाजवळ केले होते आहेत आता कविता कांदोळकर यांच्यामुळे पक्षाला झालेली पडझड मोठी मानण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT