'बांदोडकर मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले जाणार'

गोविंद गावडे: पणजी जिमखान्याच्या हद्दीचे पुनर्सर्वेक्षण करणार
Govind Gawde
Govind GawdeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कांपालच्या बांदोडकर फुटबॉल स्टेडियमच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा  प्रस्ताव क्रीडा खात्याला यापूर्वीच दिला होता. आता मी मंत्री झालोय, त्यामुळे इथे भव्य असे स्टेडियम उभारले जाणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

सोमवारी त्यांनी  पणजी जिमखानाला भेट देऊन वादग्रस्त क्रीडा खाते आणि जिमखाना हद्दीचे पुनर्सवेक्षण करण्याचे आदेश दिले. जिमखानाने क्रीडा खात्याचे सुमारे 4 हजार 200 चौ. मी जागेवर अतिक्रमण केल्याचे तक्रार आल्याने या परिसराला भेट दिली होती. यावेळी क्रीडा खात्याचे अधिकारी  , जिमखाना सचिव राजेश खंवटे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. 

Govind Gawde
विमानाने गोव्‍यात येणाऱ्यांच्‍या खिशाला कात्री

मंत्री गावडे म्हणाले, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना बांदोडकर मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदान उभारण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र काही करणाने तो प्रस्ताव मागे पडला. सध्या जागेची गरज असल्याने छोट्या जागेतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारून संपूर्ण परिसरात पार्किंग करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरामध्ये पार्किंगची मोठी समस्या असल्याने जिमखाना समोरील जागा पार्किंगसाठी वापरता येऊ शकते. क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बांदोडकर क्रीडांगणाच्या बाजून 3 हजार चौरस मीटर वर जिमखानाकडून अतिक्रमण झाल्याचे तक्रार आहे. याशिवाय कांपाल मैदानाकडूनही काही प्रमाणात जागेचा वापर केला जात असल्याच्या तक्रार आहे. येत्या आठवड्याभरात सरकारी सर्वेक्षणाच्या मार्फत संपूर्ण जागेचे सर्वेक्षण केले जाईल आणि हा प्रश्न सामंजस्याने सोडवला जाईल असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com