Margao Firing  Dainik Gomantak
गोवा

Margao Firing: किंग मोमोकडून मडगावात गोळीबार; रेस्टॉरंटच्या आर्थिक वादातून घडली घटना Watch

Margao Firing: घटनेचा व्हडिओ सोशल मिडियावर व्हायरल

Pramod Yadav

Margao Firing: फास्टफूड देवाण-घेवाणीच्या कारणावरुन मडगावात गेल्या वर्षीच्या किंग मोमोने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (दि.19) रात्री घडली.

ओल्ड मार्केटजवळ संशयिताने दोनदा गोळ्या झाडल्या. यात एक व्यक्ती थोड्क्यात बचावला. गोळीबारानंतर संशयित स्वत:हून फातोर्डा पोलीस ठाण्यात हजर झाला.

फातोर्डा पोलिसांनी संशयित रसेल डिसुझा याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 307 व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

गोळीबारात मुसीफुल्ला खान हा व्यक्ती थोड्यक्यात बचावला.

मुसीफुल्ला याने रसेल डिसुझा याच्याकडून फास्टफूड रेस्टॉरंट चालवायला घेतले होते. त्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हा वाद झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, व्हिडिओत एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच, परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

संशयित मागील वर्षीचा किंक मोमो

गोळीबार केलेला संशयित मागील वर्षीच्या कार्निव्हालमध्ये किंग मोमो बनला होता. त्याच्याकडे स्वत:चे परवाना असलेले पिस्तूल होते. मुसीफुल्ला याला धमकावण्याच्या उद्देशाने त्याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT