kidnapped school girl in cuncolim Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळीत शाळकरी मुलीचं अज्ञाताकडून अपहरण

पोलिसांकडून गोव्यासह राज्याशेजारील सर्व पोलिस स्थानकांना बिनतारी संदेश

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुंकळ्ळी परिसरात एका शाळकरी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंद झाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अज्ञाताने मुलीचं अपहरण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी परतलीच नसल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे.

कुंकळ्ळीतील एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोव्यातील सर्व पोलिस स्टेशनना बिनतारी संदेश पाठवला आहे. यात मुलीचं वर्णन सर्व पोलीस स्टेशन्सना कळवण्यात आलं आहे. अज्ञाताने अपहरण केल्याचंही याल नमूद करण्यात आलं आहे. गोव्यासह राज्याबाहेरील आसपासच्या सर्व पोलिस स्टेशन्सना याची माहिती देण्यात आली आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित मुलगी शाळेत गेली होती. मात्र शाळा सुटल्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही मुलगी घरी आली नाही. घाबरलेल्या आईने पोलीस स्टेशन गाठत मुलगी गायब असल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कलम 363 अंतर्गत अपहरणाचा तर कलम 8 अंतर्गत गोवा बाल कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT