Goa: अल्पवयीन मुलीचे अपहरण  Dainik Gomantak
गोवा

Goa: अल्पवयीन मुलीचे मडगावात अपहरण

गोव्यात(Goa) सीबीआयने(CBI) एक मोठी कारवाई केली आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भादंसंच्या कलम 363 व बाल कायदा कलम 8 या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आजीने या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक स्टेन्ली गोम्स या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. (Kidnapping of a minor girl in Madgaon)

दरम्यान गोव्यात(Goa) सीबीआयने(CBI) एक मोठी कारवाई केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून गोवा पोलिसांना एका व्यक्तीवर शंका होती, कि तो लहान मुलांचे लैंगिक शोषण(Child Abusing) करत आहे. आता सीबीआयने गोव्यातील एका व्यक्तीला 25 ते 30 मुलांवर लैंगिक शोषण केल्याबद्दल आणि गैरवर्तनाचे व्हिडिओ बनवून डार्क वेब आणि इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शेअर केल्याबद्दल त्याचबरोबर हे व्हिडोओ भारतीय आणि परदेशी डिलर्स ला विकल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक केली आहे. ही संपूर्ण माहिती काल सीबीआयच्या एका बड्या अधिकाऱ्याने दिली आहे.

अटक केलेला आरोपी गोव्यातील हॉटेलमध्ये शेफ होता. सीबीआयने 22 जून 2020 रोजी हा गुन्हा दाखल केला होता. चित्रकूटमधील लैंगिक अत्याचाराच्या आरोपीविरूद्ध केलेल्या तपासणीत तपास एजन्सीला 29 वर्षीय शेफच्या कृत्याबद्दल माहिती मिळाली. चित्रकूटचा आरोपी हा यूपी पाटबंधारे विभागात अभियंता होता.

सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी म्हणाले की, गोव्यातून अटक केलेला आरोपी हा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवीधर आहे. त्याला गोव्यात कोर्टाच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

SCROLL FOR NEXT