Goa Police Dainik Gomantak
गोवा

Nepal Girl In Goa: नेपाळच्या आरतीचे गोव्यात अपहरण? कसा घेतला शोध, पोलिसांनी सांगितला सर्व घटनाक्रम

आरतीच्या बेपत्ता होण्यामागे अपहरण, राजकीय हस्तक्षेप यासारखे मुद्दे समोर आले होते. याबाबत गोवा पोलिसांनी सर्व खुलासे केले आहेत.

Pramod Yadav

नेपाळमधील धानगाधीचे महापौर गोपाळ हामल यांची कन्या आरती गोव्यातून बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी (दि.26) मांद्रे पोलिसांत दाखल झाली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस यंत्रणा आरतीच्या शोध कार्यात गुंतल्या, तपासाअंती ती शिवोली येथील एका वेलनेस सेंटरमध्ये आढळून आली.

आरतीच्या बेपत्ता होण्यामागे अपहरण, वडिलांची राजकीय पार्श्वभूमी यासारखे मुद्दे समोर आले होते. याबाबत गोवा पोलिसांनी सर्व खुलासे केले आहेत.

आरती हामल बेपत्ता होण्यापूर्वी मांद्रे येथील एका वेलनेस सेंटरमध्ये अखेरची दिसून आली होती, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु करत, परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, समुद्र किनाऱ्यांवर तिचा शोध घेण्यात आला.

तपासाअंती आरती शिवोली येथे आढळून आली. आरतीने बाहेर जाताना मोबाईल स्वत:च केंद्रात ठेवला होता. दुसऱ्या एका रिसॉर्टमध्ये ती आढळून आली असून, ती सुखरुप असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शिवाय तिला आवश्यक वैद्यकीय मदत देखील देण्यात आली आहे.

आरतीच्या बेपत्ता होण्यामागे अपहरणचा मुद्दा नसल्याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी स्पष्ट केले. आरती मोबाईल न घेता स्वत:च दुसऱ्या केंद्रात गेली होती, असेही पोलिसांनी सांगितले.

आरती हामलचे एनजीओच्या मार्फत समुपदेन केले जात असल्याचे, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

आरती नेपाळमधील धानगाधीचे महापौर असल्याने या प्रकरणात राजकीय संबध जोडून अफवा पसरवल्या जात आहेत. आरती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर इतर कोणत्याही केस सारखे हे प्रकरण देखील हाताळण्यात आल्याचे कौशल यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT