Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पूर्ववैमनस्यातून युवकाचे अपहरण व मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी शुभम हळदणकर आणि सागर शिरोडकर यांना अटक केली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime दाडाचीवाडी-धारगळ येथील प्रज्योत राजेंद्र कोनाडकर या युवकाचे पूर्ववैमनस्यातून नागझर येथून अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पोरस्कडे येथील शुभम हळदणकर आणि माडेल-बार्देश येथील सागर शिरोडकर यांना अटक केली.

दत्तराज साळगावकर (हाऊसिंग बोर्ड, बार्देश) व आणखी एका संशयिताला अद्याप अटक झालेली नाही. मात्र, अटक केलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. प्रज्योत गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत.

सिमेंटच्या लाद्यांनी ठेचले

संशयितांनी प्रज्योतचे कारमधून अपहरण केले. नंतर पीर्ण येथील जंगलात प्रज्योतला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तसेच सिमेंटच्या लाद्यांनी मारहाण केली. प्रज्योतचा मोबाईल फोन फेकून दिला व पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली., असे तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

SCROLL FOR NEXT