Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: अपघाताने अपंगत्व आले; पण जिद्दीने मिळविले यश

Goa Accident News: खेलो इंडिया पॅरा गेम्स : गोव्याच्या लॉईड फर्नांडिसला टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदक

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: ताळगावच्या लॉईड फर्नांडिस याचे सात वर्षांपूर्वी दुचाकी अपघातामुळे सारे आयुष्यच उलटसुलट झाले आणि हरहुन्नरी टेबल टेनिसपटू अंथरुणाला खिळला. तेथून व्हिलचेअरवर कसाबसा आला; पण दुर्दैवाने नंतर तो स्वतःच्या पायावर उभे राहू शकला नाही.

मात्र, या धाडसी युवकाने जिद्द सोडली नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये ३६ वर्षीय लॉईड फर्नांडिस याने सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या गट दोनमधील अंतिम लढतीत त्याने तमिळनाडूच्या अविनाश गोपिनाथन याच्यावर ११-६, ११-७, ११-९ फरकाने मात केली.

गोव्याचे हे स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक ठरले. यावेळच्या स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये साक्षी काळे हिने दोन पदके जिंकली आहेत. तिने लांब उडीत रौप्य, तर १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदकाची कमाई केली आहे. गोव्याला आता या स्पर्धेत एकूण तीन पदके मिळाली आहेत.

राष्ट्रीय पदकापर्यंत मजल

लॉईडने २०२२ मध्ये इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत गट तीनमधील व्हिलचेअर प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. त्यानंतर पॅरा स्पर्धा निकषांनुसार तो गट दोनमध्ये दाखल झाला. यावर्षी जुलैमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत लॉईडने सुवर्णपदक जिंकले आणि आता ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्येही सोनेरी कामगिरी कायम राखली.

एकही गेम न गमावता बाजी

सुवर्णपदक जिंकताना लॉईडने स्पर्धेत एकही गेम गमावला नाही. त्याने उपांत्य लढतीत हरियानाच्या लक्ष्य गुप्ता याला ११-४, ११-७, ११-५ फरकाने हरविले. त्यापूर्वी स्पर्धेत आगेकूच राखताना त्याने गुजरातच्या जयभोले दवे याला ११-१, ११-४, ११-३ असे, हिमाचल प्रदेशच्या कार्तिक शर्मा याला ११-३, ११-१, ११-१ असे, तर हरियानाच्या पवन शर्मा याला ११-१, ११-१, ११-२ असे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT