Goa Spiritual Festival 2024  Dainik Gomantak
गोवा

Khandola News : गुरुवारपासून ‘आध्यात्मिक महोत्सव’; पद्मनाभ पीठातर्फे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा सद्‌गुरू फाऊंडेशनतर्फे गोवा स्पिरीच्युअल फेस्टिवल २०२४ (गोवा आध्यात्मिक महोत्सव) गुरुवार १४ ते १८ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

नार्वे सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये १ रोजी गोवा स्पिरीच्युअल फेस्टिवलचा शुभारंभ होईल, अशी माहिती आयोजक समितीचे अध्यक्ष वंदित नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रज्योत नाईक, सचिव सोहन नाईक, सहसचिव सचिन गावकर व खजिनदार सलिल तिवरेकर उपस्थित होते.

१७ मार्चला मिरामार समुद्र किनाऱ्यावर तपोभूमीवरील वेदविदुषी महिलांकडून यज्ञ संपन्न होणार. तसेच संध्याकाळी ४ वाजता प्रकट कार्यक्रमात गोव्यातील १०० पखवाज वादक, १०० हार्मोनिअम वादक, १०० गायक आरली कला सादर करणार आहेत. तसेच उपस्थित सर्व समुदायांकडून भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे सामूहिकरीत्या पठण होणार आहे.

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या माध्यमातून योग, संस्कृत, ज्योतिष, वेद आदि पुरातन विद्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. महिला वेदविदुषी, पौरोहित्य,

संस्कृत महाविद्यालय, संस्कार व दर्जेदार शिक्षणाने युक्त असलेली निवासी शाळा, धर्मप्रचारक, वैदिक शिक्षण, संस्कार वर्ग, संत समागम आदि विविध माध्यमातून अध्यात्मिकता जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे अलौकिक कार्य सुरू आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश गोव्याची अध्यात्मिकता व खरी ओळख संपूर्ण विश्वभर पोहोचावी हा आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

१००० युवक समर्पित होणार!

या कार्यक्रमामध्ये १००० युवक धर्मकार्यासाठी, देशासाठी, संस्कृतीसाठी समर्पित होणार आहेत. स्पिरीच्युअल क्रूजसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येतात.

त्यांच्यासाठी १८ रोजी क्रूजमध्ये आध्यात्मिक कथन होणार आहे. या पाच दिवसाच्या काळात गोव्यातील विविध पुरातनस्थळांना भेटी देण्यात येतील. तसेच गोव्याची खरी ओळख असलेल्या गोमातेचे पूजनही होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT