Khandola Government College of Arts Science and Commerce Dainik Gomantak
गोवा

Government College Khandola: खांडोळा महाविद्यालयाला ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन; पाच वर्षांसाठी कायम

NAAC Rating: ग्रामीण भागातील महाविद्यालयाने ही असाध्य वाटणारी घटना करून दाखविली असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळाने गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाला ३.४२ सीजीपीए गुणांसहित ए प्लस (A+) मानांकन देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गोव्याच्या खांडोळासारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाने ही असाध्य वाटणारी घटना साध्य करून दाखविली असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नॅकचे हे मानांकन पुढील पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे.

खांडोळा महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, येथे शिकविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा, महाविद्यालयाचे संकेतस्थळ आदी विविध घटकांचा अभ्यास करून हे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे (नॅक) हे मानांकन देण्यात आले आहे. महाविद्यालयाला ‘ए प्लस’ मानांकन मिळणे म्हणजेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यश

प्रा. डॉ. पूर्णकला सामंत आणि आय.क्यू.एडी. संचालक डॉ. डिलेक्टा डिकॉस्टा यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीमुळे हे यश प्राप्त झालेले आहे. महाविद्यालयाने एन.आय.आर.एफ. १०१ ते १५० श्रेणीमध्ये निरंतर पाच वर्षे स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयतर्फे विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा व इतर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. या यशासाठी महाविद्यालयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amba Ghat Landslide: संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

Goa Today Live News: 'पक्ष आणि राज्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, गोविंद गावडे अजूनही माझे मित्र'; प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT