खांडोळा, विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवावे. नोकरी, व्यवसाय करा. त्याबरोबरच सामाज कार्यातही सक्रीय राहावे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी विषय निवडताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले, असे प्रतिपादन सुनिल भोमकर यांनी केले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व इतर समस्येसाठी धर्मा भोमकर चॅरिटेबल ट्रस्ट कायम पाठीशी राहील.
भोम-अडकोण सोसायटीच्या महानंदू नाईक मेमोरियल हायस्कुलात शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्योजक सुनिल भोमकर, सरपंच दामदर नाईक, मुख्याध्यापिका अपर्णा वळवईकर, सोसायटीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापक दामोदर नाईक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष वासुदेव गावकर उपस्थित होते.
उद्योजक सुनिल भोमकर यांनी लाखो रुपये खर्च करून हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळेच्या इमारतीचे पेंटींग केले. गावातील विद्यार्थ्यांसाठी विद्यालयीन साहित्य व सर्वप्रकारे सहकार्य देण्याचे आश्वासन भोमकर यांनी यावेळी दिली.
दामोदर फडते यांनी स्वागत केले. धर्मा भोमकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल यावेळी आभार मानण्यात आले. सरपंच दामोदर नाईक, उद्योजक सुनिल जल्मी यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सूत्रसंचालन सीमा कुंकळीकर यांनी केले. मुख्याध्यापिका अपर्णा वळवईकर यांनी आभार मानले.
शिस्तीचे पालन करा
मुलांनी चांगला अभ्यास करावा, शिक्षक पालकांना मान द्यावा. विद्यालयात शिस्तीचे पालन करावे. आजची शिस्त ही उद्याची जबाबदारी समजून एक उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भोम अडकोण पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.