Khandepar River erosion news Dainik Gomantak
गोवा

Khandepar River: नदीकाठ तुटून कोसळला पाण्यात, झाडे पडली, हिरवाईला धोका; खांडेपार-मुर्डीवासियांनी मांडली कैफियत

Khandepar River Murdi: खांडेपार नदीचा मुर्डी भागाकडील काठ तुटत असून नदीकाठची जमीन ढासळत असल्याने नदीचे पात्र मोठे होत आहे.

Sameer Panditrao

फोंडा: खांडेपार नदीचा मुर्डी भागाकडील काठ तुटत असून नदीकाठची जमीन ढासळत असल्याने नदीचे पात्र मोठे होत आहे.

कालच मुर्डी भागातील सुमारे पंचवीस मिटरचा भाग अचानक पाण्यात कोसळला, त्यातच आणखीही काही भाग कोसळण्याच्या मार्गावर असून गावाला पुराच्या पाण्याचा धोका संभवत असल्याचे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खांडेपार नदीच्या मुर्डी तसेच लगतच्या भागातील नदीचा काठ पाण्यात कोसळून पडत आहे. या प्रकारामुळे नदीच्या काठावरील झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे. नदीचा काठ तुटत असल्याने झाडेही नदीच्या पाण्यात पडत आहेत.

हिरवाईला धोका

राज्यातील अनेक ठिकाणी नदीचे काठ तुटून पडत आहेत. खांडेपार, महादयी नदीच्या काठ कोसळून पडत असल्याने नदीचे पात्र रूंद होत आहे. यामुळे काठावरील माड तसेच इतर झाडे कोसळत असल्याने हिरवाईला धोका निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उसगाव येथील पर्यावरणप्रेमी प्रकाश नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT