गोवा

Goa News: केरी-फोंडा येथील महिला गूढरित्‍या बेपत्ता

महिलेचा शोध घेण्यासाठी घरची काही मंडळी तांबडीसुर्लकडे येत असताना रस्त्याच्या बाजूला कार उभी करुन ठेवलेली दृष्टीस पडली.

दैनिक गोमन्तक

Goa News: आर्ल, केरी-फोंडा येथील एक उच्चशिक्षित महिला काल मंगळवार दि. 10 जानेवारी सकाळी 10 वाजल्‍यापासून बेपत्ता आहे. देऊळमळ-साकोर्डा येथे कार (जीए 05 डी 1679) रस्त्याच्या बाजूला उभी करुन ती तेथून बेपत्ता झाली असून शोध घेण्यासाठी काल दिवसर मोहीम राबविण्‍यात आली, पण तिचा थांगपत्ता लागला नाही.

काल दुपारी शाळा सुटल्यावर मुलाला आणायला शाळेत गेली नसल्याने शिक्षकांनी मोबाईलवरुन संपर्क साधल्यावर कुटुंबीय सतर्क झाले व तिचा शोध घेऊ लागले.

ती महिला अध्यात्मिक विचारसरणीची आहे. देवावर तिची अढळ श्रद्धा आहे. तिला वेळ मिळेल तेव्हा ती मंदिरात जात होती.

काही महिन्यांपूर्वी ती तांबडीसुर्ल येथील शिव मंदिराला भेट देऊन आली होती, अशी माहिती तीच्या कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी घरची काही मंडळी तांबडीसुर्लकडे येत असताना रस्त्याच्या बाजूला कार उभी करुन ठेवलेली दृष्टीस पडली.

तेथून ती बेपत्ता झाल्याची घरच्याना खात्री पटली. हाकेच्या अंतरावर जंगलात तिचा मोबाईल, कारची चावी व कानातील रिंग सापडले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT