Goa Drowning Case Dainik Gomantak
गोवा

Arambol: मित्रांसोबत गोव्याची ट्रीप ठरली अखेरची, समुद्रात बुडून केरळच्या तरुणाचा मृत्यू

Arambol Beach Goa: अफताब समुद्रात पोहण्यासाठी गेला पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

Pramod Yadav

Arambol, Goa

पेडणे: गोव्यात मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. उत्तर गोव्यातील हरमल येथे आज (बुधवारी, २१ ऑगस्ट) ही घटना उघडकीस आली. मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

अफताब के. एस. सैनुदिन (25, रा. कोची, केरळ) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.

मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफताब त्याच्या मित्रांसोबत गोव्यात फिरण्यासाठी आला होता. हरमल येथील सुमुद्रकिनारी सर्वजण फिरण्यासाठी आले असता. अफताब समुद्रात पोहण्यासाठी गेला पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

स्थानिकांनी त्याला बाहेर काढून तुये येथील रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

SCROLL FOR NEXT