Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: शिवोलीत ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश, 22 लाखांचे ड्रग्ज जप्त; केरळच्या तरुणाला अटक

Siolim Drugs Arrest: अंमलीपदार्थ कक्षाच्या पोलिसांना शिवोली भागात रात्रीच्यावेळी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. शिवोली या भागात पोलिसांनी पाळत ठेवली होती.

Sameer Panditrao

पणजी: अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने राज्यातील ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करत केरळच्या २९ वर्षीय तरुण आल्विन थोमाचनला २२ लाखांच्या ड्रग्जसह शिवोली येथून अटक केली. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अंमलीपदार्थ कक्षाच्या पोलिसांना शिवोली भागात रात्रीच्यावेळी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शिवोली या भागात पोलिसांनी पाळत ठेवली होती.

संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने त्याच्या हालचालींवर नजर होती. काल रात्री तो हायड्रोपोनिक तण व एलएसडी ब्लॉट पेपर्स घेऊन संशयास्पद फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेला पदार्थ ड्रग्ज असल्याचे किट चाचणीद्वारे सिद्ध झाले. त्याच्याकडून जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २२ लाख रुपये आहे. त्याने हा ड्रग्ज कोठून आणला होता त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

बोगमाळो ड्रग्जप्रकरणी पाचजणांना अटक

चिकोळणा - बोगमाळो येथे काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने छापा टाकून जप्त केलेल्या ४३.२० कोटींच्या कोकेनप्रकरणी पाचजणांना अटक केली आहे. राज्यात ड्रग्ज माफिया व विक्रेते किनारपट्टी भागात सक्रिय आहेत. त्यामुळे सरकारने ड्रग्जविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिल्यामुळे जिल्हा पोलिस, क्राईम ब्रँच तसेच अंमलीपदार्थविरोधी कक्षाने धडक कारवाई सुरू केली आहे. विदेशी नागरिकांबरोबर स्थानिक युवकही या व्यवसायात गुंतले असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT